हे पुस्तक कहाणीच्या रूपात प्रस्तुत केलं आहे. यामध्ये एका दुःखग्रस्त माणसाची कहाणी सांगितली असून तो दुःखापासून मुक्त कसा होतो हे विशद केलं आहे. ही कहाणी प्रत्येकाबरोबर घडणारी आहे. सामान्य माणसाच्या जीवनात असणारं दुःख व त्यापासून मुक्तीचं रहस्य या कहाणीद्वारे आपणासमोर ठेवण्यात आलं आहे. वास्तविक खुशी, आनंद हाच माणसाचा मूळ स्वभाव आहे. परंतु माणूस या रहस्यापासून अनभिज्ञ असल्यामुळे तो आनंदाच्या शोधात इतरत्र भटकत असतो. आनंदाने आनंदाचा शोध कसा घ्यावा ही कला आपणास हे पुस्तक शिकवेल.
आजच्या परिस्थितीत सापालाच शिडी बनवून त्याच्यासमोर साधना कशी करायची? समोरच्या माणसाचा नकारात्मक प्रतिसाद असतानादेखील त्याची मदत कशी घेता येईल? इतरांच्या द्वेष, मत्सरातूनही बळ कसं प्राप्त करायचं? पृथ्वीवर येण्याचं खरं लक्ष्य काय आहे? दुःखातही खुश का आणि कसं राहायचं? या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘संवाद गीता - दुःखात खुश राहण्याची कला’ या पुस्तकात मिळतील.
हे केवळ पुस्तक नसून तीस दिवसाचं शिबिर आहे. याचा उपयोग करून आपण निरंतर खुश राहण्याचा दृढ संकल्प करू शकाल.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|