यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय? विविध लोकांच्या सफलतेच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. खूप पैसा मिळवणं म्हणजे यशस्वी होणं असं काही लोकांना वाटतं तर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवणं म्हणजे सफलता प्राप्त करणं असं काहींचं मत असतं. अधिक बारकाईनं विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सफलतेचा आणि अशा संकुचित व्याख्यांचा वास्तविक काहीही संबंध नाही.
या पुस्तकाद्वारे आपल्याला ‘महासफलतेचं’ दर्शन घडत आहे. मूळ सफलता, मूलभूत सफलता आणि महासफलता या प्रवासात आपल्या जीवनाचा प्रत्येक कोपरा उजळून काढणार्या दिव्य प्रकाशाची प्राप्तीच आपल्याला होणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर काम करून सजगपणे या महासफलतेचा अनुभव घ्यायला हे पुस्तक आपल्याला शिकवतं. अशक्य वाटणार्या गोष्टी सहज सुलभ करून आपल्या समोरचा मार्ग उजळून टाकेल.
हे पुस्तक वाचायला सुरुवात करणं म्हणजे महासफलतेच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकणं होय आणि हे पहिलं पाऊलच महत्त्वाचं असतं. पुढचा प्रवास आपोआपच घडत जातो. आपल्या या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|